कविता – रमाई

0
82

बाबासाहेब आंबेडकरांची
पत्नी होती रमाई
दिनदुबळ्यांची आणि
गोरगरिबांची होती आई

जीवन गेले तिचे
काबाड कष्टात तरी
हसतमुख असलेली
रमाई होती कष्टकरी

पती गेले परदेशात
उच्च शिक्षण घेण्यास
राहिली मागे एकटी
संसार सांभाळण्यास

अस्पृश्य म्हणून
ब्राह्मणांनी दिला त्रास
जातीभेद विरुद्ध दोघांनीही
आंदोलन केले झकास

बिकट परिस्थिती असताना
पोटभर अन्न नसताना
संसार केला हिमतीने
निस्वार्थ सेवा केली रमाईने

कवयित्री – रेखा डायस
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here