आई वडिलांची शोभा कुठेच नाही
साऱ्या जगताहून श्रेष्ठ असे आई।।
आईची माया पहा प्रेमळ किती
आई सारखे दुसरे कोणी नसती।।
आई आपल्या पिलांना पोसते
किती दुःख यातना ती सोसते।।
बाळ सुखात राहावे असे वाटते
लेकरासाठी प्रेम वाटून टाकते।।
पाहत नाही कधीही स्वःताकडे
बाळासाठी डोळे तिचे रस्त्याकडे।
बाळ माझा येईल म्हणून बसते
बाळासाठी ती कासावीस असते।।
बाळ असेल सुखात तर ती सुखी
बाळासाठीच घास अडतो मुखी।।
अशा आईला आज करू वंदन
तिच्यासाठी अर्पण करु तनमन।।
आई माझी सुखात नेहमी असावी
हीच आई जन्मोजन्मी लाभावी।।
कवियत्री- कु.समिंदर शिंदे
लातूर

