कविता चतुर्थ वर्धापनदिन
प्रबोधिनी न्युज असेच
गाठत राहो उंच शिखरे
जुळून यावीत नाती छान
जवळ यावीत काव्य पाखरे।।
प्रशांत रामटेके सर यात
खुप मेहनत घेत राहतात
दूर गेलेली नाती सुद्धा
ते प्रेमाने जवळ करतात।।
प्रत्येक सारस्वतांचा ते
करत असतात मान सन्मान
प्रत्येक जण गात असतो
आपल्या प्रबोधिनीचे गुणगान।।
बघता बघता प्रबोधिनीला
चार वर्षे आज पूर्ण झाले
चतुर्थ वर्धापनदिन आज
सुवर्ण अक्षरांनी साजरा केले।।
मिळत जावो असेच यश
आपल्या प्रबोधिनी चॅनलला
नेहमीच कार्य करते छान
याचा अभिमान असे आम्हाला।।
प्रबोधिनी न्यूज चॅनल आज
सर्वांच्या मना मनात बसले
जसे अंधाराच्या प्रकाशात
पुन्हा प्रफुल्लित छान दिसले।।
प्रबोधिनी न्यूज चॅनलची
सेवा खूप वाटते छान
सामाजिक आर्थिक राजकीय
सर्वच बातम्या असतात महान।।
प्रबोधिनी चॅनलची नेहमी
व्हावी पूर्ण प्रत्येक इच्छा
कोटी कोटी सारस्वतांच्या
तुम्हाला लाख कोटी शुभेच्छा…
कवियत्री प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

