प्रीत तुझी नी माझी
निखळ ती असावी
शब्दावाचून मनातली
भावना ही कळावी…
ओढ अशी असावी की
शब्दात नसांगता यावी
नजरेतून स्पष्ट दिसत
ह्रदयी थेट पोहचावी…
मनातील माझ्या प्रत्येक
विचार तुला कळावा
हृदयातून हृदयाशी
निखळ बंध जुळावा….
क्षणांचा हा प्रवास
सुंदर सुरेख व्हावा…
गर्दीतही हात तुझा
माझ्या हातात असावा…
प्रेमाची ही वळणे
विश्वासाने बांधावी
आपली कहाणी
अनंत काळ टिकावी…
निखळ प्रेमाचं नात
आपलं प्रेमाने दृढ व्हावं
आयुष्यभरासाठी आपण
एकमेकींसाठी चालावं…
कवयित्री संध्या रायठक/ धुतडे
शिक्षिका, नांदेड

