वेदनेचा अंधार गेला
आली सुखाची पहाट
सडा रांगोळी सजली
दिसे सर्वत्र झगमगाट ।।
फुलली ती अबोली
दारी मोगरा हसरा
सोनेंरी किरणे अन
मनी मोर नाचरा ।।
सगळीकडे पहाट
कशी प्रसन्न दिसे
धुक्याची साडी चोळी
गाली लाली असे ।।
किती वर्णावे पहाट
तुझा असे झगमगाट
अंधार दूर सारून
आली सुखाची पहाट।।
रानी जागली पाखरे
गायी हंबरून आल्या
झोपलेल्या कळ्या ही
सुंदर फुलं झाल्या।।
कवयित्री प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

